1 minute reading time (91 words)

[ABP MAJHA]CM ना चॅलेंज, डिबेटसाठी तयार म्हणत सुळेंचं प्रत्युत्तर!

CM ना चॅलेंज, डिबेटसाठी तयार म्हणत सुळेंचं प्रत्युत्तर!

लोकसभेच्या 543 जागांमध्ये 33 टक्के महिलांना लगेच आरक्षण द्या, हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे, 2023 साली मंजूर झालेले विधेयक 2026 उजाडलं तरी लागू का झाले नाही? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? 50 टक्के जागा प्रत्येक राज्यात वाढवणार असं आम्हाला सांगितले होते. मग ते विधेयकात का नव्हते? मुख्यमंत्री महिला आरक्षणाबाबत खोटं बोलत आहेत, असे मला म्हणायचे नाही. मात्र, यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयार आहे. मुख्यमंत्री म्हणतील ती जागा आणि वेळ मला मान्य आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलेले आव्हान स्वीकारले.  

[LS Marathi]Women Reservation | सुप्रिया सुळे यांच...
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIV...