1 minute reading time
(76 words)
[ABP MAJHA]जुमलेबाज सरकारकडून रोज भ्रष्टाचाऱ्यांना क्लिन चीट
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाजपचे काम असल्याचे सुळे म्हणाल्या. सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं केली. मात्र, कधी कॉम्प्रोमाईज केलं नाही असंही सुळे म्हणाल्या.