1 minute reading time
(68 words)
[News18 Lokmat]मुंबईत ठाकरे बंधुंसोबत अन् पुण्यात दादांसोबत युती? काय म्हणाल्या सुळे?
अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले आहेत. कोण काय बोलत यावर विश्वास ठेवू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

