3 minutes reading time (561 words)

[Zee 24 Taas]अजित पवारांनी काका शरद पवारांसोबत युतीची तारीख केली जाहीर! बहीण सुप्रिया सुळे म्हणाल्या 'विचार करुन...'

अजित पवारांनी काका शरद पवारांसोबत युतीची तारीख केली जाहीर! बहीण सुप्रिया सुळे म्हणाल्या 'विचार करुन...'

Supriya Sule on Alliance with Ajit Pawar NCP: अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी 26 तारखेला अधिकृत घोषणा करू असं सांगितलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील असं ते म्हणाले आहेत. कोण काय बोलत यावर विश्वास ठेवू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सुप्रिया सुळे यांनी मात्र आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ते बोलले असतील तर विचार करुनच बोलले असतील असं त्यांनी सांगितलं आहे. "ते जर काही बोलले असतील त विचार करुनच बोलणार. माझ्याशी कोणीही बोललेले नाही, हे जबाबदारीने सांगू शकते. शरद पवार बारामतीला गेले आहेत. त्यांच्याशी माझं काही बोलणं झालेलं नाही", असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

'प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नाही'

यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्याचे दावे फेटाळून लावले. प्रशांत जगताप यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. कोणीतरी बदमाशी करत आहे. कोणीतरी खोट्या बातम्या पसरवत आहे

नाराज मुलं होतात. नाराजी हे बाळबोध शब्द आहेत. आमच्यासाठी आधी देश, नंतर राज्य, नंतर पक्ष आणि नंतर कुटुंब आहे. प्रोफेशनल व्यक्तीला नाराज होण्याचा हक्क नसतो. आम्ही सर्वांशी चर्चा करुन सांगत आहोत. सगळंच सगळ्यांच्या मनासारखं होत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

"राजीनाम्याचं मला माहित नाही, माझ्याकडे राजीनामा आला नाही. आघाडी कोण कसं करणार याची चर्चा अनेक होत असते. प्रत्येकाचं मत असतं...आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही चर्चा करू. प्रशांत जगताप यांच्याशी आम्ही काल चर्चा केली. पुण्यात बंटी दादासोबत अजित दादाबोलत आहेत. आमची मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तो केंद्रबिंदू आहे. पुण्याचा विकास केंद्रबिंदू असला पाहिजे," असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

अजित पवारांचा भाजपला रोखण्यासाठी नवा गेम प्लॅन

पुण्यात अजित पवारांचा भाजपला रोखण्यासाठी नवा गेम प्लॅन समोर आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करुन महापालिका लढण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे. शरद पवारांशी आघाडी जवळपास पक्की असून काँग्रेससोबतही आघाडीसाठी चर्चा सुरु आहे. भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी अजित पवारांनी ही रणनिती आखली आहे. भाजपला पुण्यात घाम फोडण्याचा दादांचा गेमप्लॅनमुळं पुण्याच्या निवडणुकीची रंगत वाढलीय.

राज्यात 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर युती, आघाडीबाबत चाचपणी सुरू आहे. भाजपने पुण्यात अजितदादांसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादीने नवीन जुळवाजुळव सुरू केली आहे. आता पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड असून, येथे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा होती. त्याला अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी पुष्टी देत मोठा दावा केला आहे. दोन्ही पक्षांमधील नेत्यांचं आघाडीबाबत बोलणं झालं असून लवकरच त्यांची घोषणा होईल असं धनकवडे यांनी सांगितलं आहे. सोबतच तुतारीचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचा मोठा दावा धनकवडे यांनी केला आहे.

दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना शरद पवारांची नेत्यांनी मूक संमती दिली आहे. सोबतच आघाडीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील असं स्पष्ट केलं आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी SPच्या बैठकीतही तसा प्रस्ताव देण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

...

Supriya Sule on alliance between Sharad Pawar NCP and Ajit Pawar NCP for Pune Municipal Corporation Election | अजित पवारांनी काका शरद पवारांसोबत युतीची तारीख केली जाहीर! सुप्रिया सुळे म्हणाल्या 'विचार करुनच...'

Supriya Sule on Alliance with Ajit Pawar NCP: अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत. अजित पवार यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
[Web Dunia]राष्ट्रवादीच्या गटांच्या विलीनीकरणाबाबत...
[LetsUpp Marathi]प्रशांत जगतापांचा राजीनामा आलेला ...