2 minutes reading time (412 words)

[News18 Marathi]राष्ट्रवादीच्या खासदारांना व्हीप, मतदारसंघ पुनर्रचनेवर भूमिका काय? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला!

राष्ट्रवादीच्या खासदारांना व्हीप, मतदारसंघ पुनर्रचनेवर भूमिका काय? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला!

मुंबई: केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाचे लोकसभेतील प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळातील सस्पेन्स अधिकच वाढवला आहे.केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना दोन्ही सभागृहांचे कामकाज बोलावण्याची विनंती केली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे, तर २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू असून आवश्यक समीकरणे जुळवली जात असल्याची चर्चा आहे.

प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांमुळे लोकसभेच्या सध्याच्या ५४३ जागा कमाल ८५० पर्यंत वाढवता येऊ शकतात. या माध्यमातून लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. दुसरीकडे, लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, "संसदेचे अधिवेशन सत्र जाहीर झाले आहे, पण मला अजेंडा माहीत नाही. मी अजून विधेयकही पाहिलेले नाही. ते पाहिल्याशिवाय मी त्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही काढलेला व्हीप हा आमच्या खासदारांनी अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अजून आलं नाही... आधी पवार साहेब बोलले की भारताच्या हितासाठी जे असेल त्यासोबत आम्ही आहोत. या विधेयकावर आमच्या पार्टीची लाईन लोकसभा फ्लोरवर कळेल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सुळे यांच्या या वक्तव्यामुळे विशेष अधिवेशनात शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊतांची टीका, विधेयकाला पाठिंबा देणारे...शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना देशाची जनता इतिहासात 'गद्दार' म्हणून लक्षात ठेवणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. भाजपकडून लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेकडून सत्ता हिरावली जात आहे. त्यामुळे जे खासदार सरकारच्या बाजूने मतदान करतील, त्यांना जनता गद्दारच मानेल असे त्यांनी म्हटले. 

...

Supriya Sule On Delimitation Bill : राष्ट्रवादीच्या खासदारांना व्हीप, मतदारसंघ पुनर्रचनेवर भूमिका काय? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला! | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

Supriya Sule On Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळातील सस्पेन्स अधिकच वाढवला आहे.
[TV9 Marathi]राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी! इ...
[Pudhari News]सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या...