1 minute reading time (291 words)

[policenama]‘तर मग टेकडी कशी असते?’

‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल

खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला (Vetal Hill Project) नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार केला पाहिजे. पुण्याचे पर्यावरण (Environment of Pune) वाचविणे आवश्यकच आहे. टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पाहायला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या.

सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Balbharti Road) विरोध होत आहे. त्याबाबत जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वेताळ टेकडी येथे आल्या होत्या. त्यांनी कृती समितीच्या सदस्यासोबत रस्ता कुठून जाणार आहे? किती आणि कोणती झाडं तोडली जाणार, याबाबत माहिती घतेली. त्यानंतर वन विभागाच्या कार्य़ालयात जाऊन कृती समितीने (Action Committee) तयार केलेले टेकडीबाबतचे सादरीकरण जाणून घेतले.

पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यापूर्वी म्हणाले होते की, रस्ता होतोय, ती टेकडीच नाही. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक म्हणतात, टेकडीवर रस्ता आहे, तर काही लोक म्हणतात टेकडीवर रस्ता नाही. यामध्ये वस्तूस्थिती काय आहे? ते पाहण्यासाठी मी टेकडी पाहण्यासाठी आले. प्रशासनाला वाटत असेल की, ही टेकडी नाही, तर मग मी पाहिली ना ही टेकडीच आहे. त्यांना जर वाटत नसेल की ही टेकडी नाही, तर मग टेकडी कशी असते? असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी पालिका आयुक्तांना विचारला.

...

MP Supriya Sule | 'तर मग टेकडी कशी असते?' खा. सुप्रिया सुळेंचा मनपा

वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला (Vetal Hill Project) नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule
[the karbhari]वेताळ टेकडीबाबत महापालिका आयुक्तांची...
[Sakal]प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे