[LetsUpp Marathi]'लाडकी बहीण' योजनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले
महाराष्ट्रातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. सध्याच्या महागाईच्या काळात महिलांना 1500 रुपयांचा फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला. संसदेचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर सुप्रिया सुळे आज पुण्यात आहेत. आज सकाळी 10 वाजता त्यांची एमएसईबीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीनंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधला. पुणे आणि परिसरातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसंबंधी त्यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली त्यानंतर आज रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयावरील बैठकीत त्या सहभागी होणार आहेत.