2 minutes reading time (438 words)

[lokmat news18]बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ

बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ

खासदार सुप्रिया सुळे यांचा सोशल मीडियाबाबत लहान मुलांना सल्ला


 पुणे, 9 एप्रिल : दिवसेंदिवस सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. पूर्वी मोठ्यांच्या खिशात दिसणारा स्मार्टफोन आता चिमुकल्यांच्या हातातही दिसू लागला आहे. परिणामी दिवसातील मोठा वेळ सोशल मीडिया वापरण्यात वाया जात आहे. या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका लहान मुलाशी संवाद साधला. यावेळी मी देखील रिल्स पहाते पण त्याला टायमर लावला आहे, अशी कबुली सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यातील बावधनमध्ये विहिरीच भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या.

मला तुझ्या व्हाट्सअप ग्रुप वर ऍड कर ना : सुप्रिया सुळे

पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी उपस्थित एका लहान मुलीश संवाद साधला. माझ्यापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे, मी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, असं सांगत मला तुझ्या व्हाट्सअप ग्रुप वर ऍड कर ना? अशी विनंती लहान मुलाला केली. माझा नवरा देखील मला ऑनलाईनच शोधतो, त्याला माहिती आहे मी फोन बघत नाही. मी रोज फक्त7 मिनिट रिल्स बघते. मी त्याला टाइमर लावला आहे, अशीही कबुली सुळे यांनी दिली.

पुणे मनपाने गेले पाच वर्षात कुठलेच काम केले नाहीत : सुळे

तुकाराम महाराज आठवतात देवाच्या दारात एक क्षण उभा राहा काम करा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, मुख्यमंत्री यांना शुभेच्छा आहेत, राज्यात शेतकरी अडचणीत आहे, त्यांनी वेळ पुढे ढकलायला हवा होता, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर दिल्या आहेत. पवार साहेब यांची मुलाखत नीट ऐका कळेल, आमचे कोणाशी संबंध आहेत ते सर्वाना माहिती आहेत. जेपीसीचा इतिहास बघा, आम्हाला काहीच मिळत नाही, त्यात भाजपचे दहा पंधरा लोक आहे. मग खरं बाहेर येईल का? मी इतिहास फक्त शाहू आणि शिवाजी याचा वाचते. सध्या अनेक प्रश्न राज्य व देशासमोर आहेत. 2024 ला ही मविआ एकत्रितपणे राहील. चंद्रकांत पाटील यांना वेगळी काही माहिती असेल मला नाही माहिती, असंही सुळे म्हणाल्या.

पाण्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

24 तास पाण्याची त्यांची कमिटमेंट होती, मी खोटी कमेंट करणार नाही. त्यांनी सांगितलं होतं की 24 तास पाणी देऊ. मी राजकारणी आहे एक तरी चिमटा त्यांना काढणारच ते किती आमचे चिमटे काढतात. बिल्डर सुरुवातीला दाखवतात आपल्या स्वप्नातील घर. पण पुढे जाऊन अनेकजण कुठल्याच सोयी सुविधा देत नाहीत. मी माझ्या मतदारसंघात अशा अनेक सोसायटी पाहिल्या आहेत. रोटी कपडा मकान, मीटर, गटार आणि वॉटर हीच तर आपली गरज आहे. आमच्या चांगल्या काळात तुम्ही सगळे लोक आमच्यासोबत उभे होता. तुमचं आमचं नातं व्यवहारिक नाही हे नातं दिल से आहे. तुम्ही मत दिलं असेल पण तुमची सेवा मी करणार आहे. तुमची लोकप्रतिनिधी म्हणून कामे करावीच लागेल. मी जाणून बुजुन त्यांचा विरोध कधीच करत नाही. मतभेद हवेत मनभेद नको, असं सुळे यांनी सांगितले.

...

बिझी टाईमटेबलमध्ये सुप्रिया सुळेंचा रिल्ससाठी स्पेशल वेळ, लहान मुलासमोरच कबुली – News18 लोकमत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाबाबत लहान मुलाला सल्ला दिला आहे.
[TV9 Marathi]BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आ...
[Sakal]राजीव गांधी प्राणी संग्रहालय तलावातील जलपर्...