2 minutes reading time (407 words)

[ABP MAJHA]पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या;

पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या;

म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला

पुणे : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील (Pune) हातभट्टी दारुकांडात एकूण 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही तीव्र संताप व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विषारी दारुकांडसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षनिधी आणि पार्थ पवार-छगन भुजबळ यांच्यासंदर्भातही भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) आर्थिक ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षनिधी उभारणीवर विशेष भर दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरुन, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिणार असल्याचे सुळेंनी त्यांनी म्हटले.

केंद्र सरकारच्या गृह विभागाचा अहवाल आहे की, पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात सर्वात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय. त्यामुळे, पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. नसरापूर प्रकरणात देखील आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. पोलिसांनी लवकर चार्जशीट दाखल केलं, मात्र हे गुन्हे रोखले पाहिजे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तसेच, हे सरकारचे अपयश आहे, हप्ते घेऊन गुन्हे केले जातायत.

पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या गटात काय होतय हे मला माहित नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही. पण, काल एक व्हिडीओ माझ्याकडे आला आहे. मी आरोप केलेला नाही, तुम्ही याबाबत भुजबळ साहेबांना विचारा, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भुजबळ आणि त्यांच्या खात्याचा कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील संवाद सांगितला आहे. भुजबळ यांच्या खात्यातील एक कॉनट्रॅक्टर म्हणतो की, गेली काही वर्षे काही ठराविक कॉनट्रॅक्टरच पुरवठ्याचं काम करत आहेत. त्यामुळे, यात भ्रष्टाचार होत असेल तर त्याची चौकशी करावी. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे, मला अपेक्षा आहे की, मुख्यमंत्री सामान्य नागरिकांचा पैसा वाचवतील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षनिधी आणि वादावर दिलीय.

प्राजक्त तनपुरेंनी मला अडचण सांगितली

प्राजक्त तनपुरे काल मला मला भेटायला आले होते, त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या. सगळ्याच अडचणी कॅमेरासमोर सांगायचा नससतात, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाची माहिती दिली. तसेच, भाजप नेते म्हणतायत की काँग्रेसमुक्त भारत पण नगरच्या राजकारणाकडे बघा एक राम शिंदे सोडले तर सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच भाजपमधे गेले आहेत. विचारधारा उरलीय का? असा प्रश्न मला पडलाय अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला टोलाही लगावला. 

[TV9 Marathi]देशात मिनी लॉकडाऊन लागणार? सुप्रिया स...
[Saam TV]'पुण्याचा कारभार पाहणाऱ्याला सुट्टीवर पाठ...