1 minute reading time (100 words)

[TV9 Marathi]'रिश्ते मायने रखते है' सुळेंचा सुनेत्रा वहिणींना पाठिंबा

'रिश्ते मायने रखते है' सुळेंचा सुनेत्रा वहिणींना पाठिंबा

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. तरीही अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात आले. पण तरीही काँग्रेसने तिथे उमेदवार जाहीर केला होता. यानंतर सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन उमेदवारी माघारी घेण्याची विनंती केली होती. तसेच इतर नेत्यांनीदेखील हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती. त्यामुळे काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. या घडामोडींनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपुरात जावून विठोबाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. 

[TV9 Marathi]आम्हाला प्रचारासाठी फोन आला नाही सुळे...
[Jai Maharashtra News]तर Sunetra Pawar यांच्या प्र...