1 minute reading time (171 words)

[sakal]राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

गॅस पेटवून केला शुभारंभ

वारजे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला.

खासदार सुळे याना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच त्या वारजेत येत होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन दोडके यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. सोसायटीत येताच फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.

तसेच 25 महिलांच्या हस्ते मोठा हार घालून त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी सुळे कोणतेही भाषण न करताच पुढील दौऱ्यासाठी निघून गेल्या. यावेळी माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी नगरसेविका सायली वांजळे.

शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी सुरेश गुजर, भावना पाटील, निलम डोळसकर, पॉप्युलर नगर सोसायटीचे सचिव नितीन पाटील, बाळासाहेब देशमुख व सोसायटीचे पदाधिकारी उपस्तित होते.यावेळी सुळे यांनी केली वारजे पुलाची पाहणी करून महामार्ग प्रधिकरणाला काम लवकर करण्याच्या सूचना दिल्या.

[Mumbai Tak]राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यान...
[saamtv]राज्याची आन बान शान परत आणण्यासाठी महाविका...