1 minute reading time (211 words)

[News18 Marathi]'महायुती सरकार एमबीबीएस'

'महायुती सरकार एमबीबीएस'

सुप्रिया सुळेंनी सांगितला नवीन फुल फॉर्म!

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय. राज्यातलं हे सरकार म्हणजे एमबीबीएस अर्थात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज त्यांनी खडकवासला मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासाठी पुणे मनपाच्या आयुक्तांची भेट घेतली.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी नेमकं कोण पैसा उपलब्ध करून देणार? असा जाबही सुप्रिया सुळे यांनी पालिका आणि शासनाला विचारला. तसंच लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन या सरकारने पुणे मनपा हद्दीतील 34 गावच्या टॅक्स वसुलीला स्थगिती दिली होती, पण आता आचारसंहिता संपताच लोकांना पुन्हा टॅक्स वसुलीच्या नोटीसा येऊ लागल्यात त्याचं उत्तर हे महायुती सरकार देणार का? असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रामध्ये दोन वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला होता, तेव्हा या सरकारचा उल्लेख सुप्रिया सुळे यांनी ईडी सरकार असा केला होता. यात इ म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. 

...

Supriya Sule : 'महायुती सरकार एमबीबीएस', सुप्रिया सुळेंनी सांगितला नवीन फुल फॉर्म! supriya sule targets maharashtra government says they are mbbs tells new full form – News18 मराठी

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातल्या महायुती सरकारला आता एमबीबीएस हे नवं नाव दिलं असून त्याचा लॉगफॉर्मही सांगून टाकलाय.
[Lokshahi]सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना पत्र...
[Loksatta]“टीम इंडियासाठी गुजरातहून बस का आणली या ...