1 minute reading time (80 words)

[Lokshahi Marathi]'रोहित पवारांची काळजी वाटते, तातडीने सुरक्षा द्यावी'

'रोहित पवारांची काळजी वाटते, तातडीने सुरक्षा द्यावी'

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे सातत्याने या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी, अशी मागणी केलीय. मला रोहितची काळजी वाटते. आज रोहित पवार जो फॅक्ट मांडत आहे, त्याबाबत सर्वांना त्याची काळजी वाटत आहे. माजी राज्य सरकारला विनंती आहे की, आज ज्या पद्धतीने रोहित पवार लढत आहे ते पाहता त्याला सुरक्षा देण्यात यावी, असंही यावेळी सुळे म्हणाल्या. 

[Loksatta]"रोहित जे तथ्य मांडतोय..."; सुप्रिया सुळ...
[Maharashtra Times]रोहित ज्या पद्धतीने मुद्दे मांड...