[ABP MAJHA]मी पांडूरंगाची भक्त आहे... तो कधीच या म्हणत नाही भेटायला
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 'विठू माउली माझी' या कार्यक्रमाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल मणियार, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, इतिहास अभ्यासक व लेखक संजय सोनवणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील निवडक २०० कवितांचा समावेश असलेल्या 'मराठी अभिजात' या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी झाले..'वारी हे समतेचे प्रतीक आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सर्वप्रथम संतांनी केले. भक्ती आणि शक्तीला विज्ञानाची जोड दिल्यावर आपला विकास होऊ शकतो'', असे सांगत सुळे म्हणाल्या,