2 minutes reading time (380 words)

[mymahanagar]पुण्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका

पुण्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका

सुप्रिया सुळेंचे गृहमंत्री फडणवीसांना आवाहन

 मुंबई : नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती सुदैवाने टळली आणि हल्लेखोराच्या तावडीतून एक तरुणी बचावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी तरुणीला वाचवणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच, पुण्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका, असे आवाहन त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

MPSC परीक्षेत तिसऱ्या क्रमांकाने पास झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह 18 जूनला पुण्यातील राजगडावर आढळला होता. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे नामक आरोपीला अटक केली. या घटनेला 10 दिवस झालेले नसतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात MPSCच्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठेत ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही महाविद्यालयीन तरुणी थोडक्यात बचावली आहे. या प्रकरणातील आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी हा मुलीचा मित्र असल्याचे सांगण्यात आले. हे दोघेही आधी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर या तरुणाने त्या मुलीसमोर प्रेम व्यक्त केले. पण तरुणीने त्याला नकार दिला. पण गेल्या काही दिवसांपासून या आरोपीने मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तसेच तिला तिच्या कॉलेजच्या बाहेर गाठून तो मारहाणही करत होता.

आज सकाळी ही मुलगी कॉलेजला मित्रासोबत जात असताना त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत तरुणीच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. लेशपाल जवळगे या तरुणाने धाडस करत आरोपीला पकडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने लेशपालला मदत करत आरोपीला पकडून त्याच्या हातातील कोयता काढून घेतला. या घटनेसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे.

पुणे शहरात भररस्त्यात तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावणाऱ्या तरुणाला अडवून त्या मुलीचे दोन तरुणांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. या तरुणांनी दाखविलेले धाडस अतिशय कौतुकास्पद आहे. मुलीवर प्राणघातक हल्ला होत असताना आपल्या प्राणाची पर्वा केली नाही, असे सांगतानाच, राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, पुणे शहर व परिसरातील कोयता घेऊन हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे त्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका, असे आवाहन खासदार सु्प्रिया सुळे यांनी केले आहे.

...

Pune crime: Don't make Pune a paradise for criminals, Supriya Sule appeals to Home Minister Fadnavis msj

मुंबई : नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुण्यात दर्शना पवार हत्याकांडाची पुनरावृत्ती सुदैवाने टळली आणि हल्लेखोराच्या तावडीतून एक तरुणी बचावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी तरुणीला वाचवणाऱ्यांचे आभार …
[thekarbhari]कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौ...
[saamtv]पुणे विद्येचे माहेरघर, त्याला गुन्हेगारांच...