1 minute reading time (95 words)

[Lokmat]वित्तमंत्रालयाला झुगारुन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात?

वित्तमंत्रालयाला झुगारुन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात?

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 "सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्राचं अर्थकारण अडचणीत आहे असं जर ते म्हणत असतील तर ही चिंतेची बाब आहे. याला जबाबदार ट्रिपल इंजिनचं सरकार आहे", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच वित्तमंत्रालयाला झुगारुन कॅबिनेटमध्ये निर्णय घेतात का? असेही त्या म्हणाल्या. 

[Sarkarnama]तुम्ही त्यांना मतदान केलं तर तुम्हाला ...
[Maharashtra Times ]पुण्यातून सुप्रिया सुळे लाइव्ह