1 minute reading time (143 words)

[Maharashtra Khabar]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

 दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत त्यांना बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड आणि इंदापूर तालुक्यांना भेट देण्याची विनंती सुळे यांनी केली.

आपल्या मतदार संघातील विकास कामे आणि नागरिकांच्या हितासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच आग्रही असतात. त्याचीच प्रचिती कालही दिल्लीमध्ये आली. अल्पोपहाराच्या निमित्ताने देशाच्या राष्ट्रापतींना भेटण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्याशी चर्चा करताना खासदार सुळे यांनी दौंड येथील रेल्वे आणि अन्य विकास कामे तसेच इंदापूर तालुक्यातील उजनी धरणावर येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांबाबत माहिती दिली. तसेच याठिकाणी भेट देण्यासाठी राष्ट्रपतींनी यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
...

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण - Maharashtra Khabar

दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या अल्पोपहाराच्या वेळी झालेल्या भेटीत
[the karbhari]पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजा...
[Policenama]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट...