1 minute reading time (197 words)

[the karbhari]पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे – खासदार सुप्रिया सुळे

MP Supriya Sule news | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha constituency) इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या (Widow) सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या. (MP Supriya Sule News)

समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले. (Baramati Loksabha Constituency)

अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

[mtvmarathi]पती निधनानंतर कोणत्याही महिलेला समाजान...
[Maharashtra Khabar]खासदार सुप्रिया सुळे यांच्याकड...