[TV9 Marathi]हो पत्रकार म्हणून खरातांना ओळखते, लावा चौकशी-सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपण पत्रकार तुषार खरात यांना ओळखत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पण या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी ज्या लोकांची नावे घेतली त्यांना आपण ओळखतही नसल्याचं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिलं. "एका सशक्त लोकशाहीत एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रोब्लेम काय? हा माझा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे मला आश्चर्य आहे. माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे तुम्ही पारदर्शकपणे पाहतात. मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेलं नाही. करणारही नाही. कारण माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार माझ्यावर आहेत", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.