1 minute reading time (132 words)

धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - खासदार सुप्रिया सुळे

शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी

लोकसभेत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची भूमिका होती, परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले.

नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहेत, असा आरोपही सुप्रिता सुळे यांनी केला. त्यामुळे भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली.

आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करत नसून ते तसेच राहिले पाहिजे. इतरांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, अशीच भूमिका आमच्या महाविकास आघाडीची आहे, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - खासदार सुप्रिया सुळे.
धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्...
राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रि...