1 minute reading time (244 words)

[news18marathi]'घर वडिलांचं, त्यांनी वडिलांनांच घराबाहेर काढलं'

'घर वडिलांचं, त्यांनी वडिलांनांच घराबाहेर काढलं'

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई: सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्राच्या राजकारतील खळबळ उडवणारा हा निकाल आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला अजून शरद पवार गटाला मोठा धक्का आहे. आता या निकालावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवसेनेसोबत जे घडलं तेच राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत घडलं असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. अपेक्षित होतं तेच घडलं आणि मला या निकालावर काही आश्चर्य वाटलं नाही. आम्ही पुरावे दिले, आम्ही युक्तीवाद लढला, आमची सत्याची बाजू होती मात्र आमच्याकडे अदृश्य शक्ती नव्हती. अदृश्य शक्ती त्यांच्या बाजूने आहे आणि ती शक्ती कोणती आहे ही तुम्हीच ठरवा.

सुरुवातीपासून हा पक्ष शरद पवारांचा आहे आणि त्यांनीच हा उभा केला आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांनी घर बांधलं त्याच वडिलांनाच घराबाहेर काढलं आहे. शून्यातून सुरु केलेला हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत', असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.

...

'घर वडिलांचं, त्यांनी वडिलांनांच घराबाहेर काढलं' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया – News18 मराठी

सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल जाहीर केला असून महाराष्ट्राच्या राजकारतील खळबळ उडवणारा हा निकाल आहे.
[Maharashtra Times]आयोगाच्या निर्णयावर सुप्रिया सु...
[Saam TV]निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा गंभ...