1 minute reading time (212 words)

[sakal]संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना...

बारामती - संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली असे नमूद करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली हुरहूर समाजमाध्यमाद्वारे प्रकट केली आहे.

फेसबुकवर लिहीलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून 2009 मध्ये सर्वप्रथम लोकसभेत आपण सर्वांनी मला निवडून दिले. तेव्हापासून 2014 आणि 2019 असे सलग तीनवेळा मला खासदार म्हणून निवडून लोकसभेत पाठविले.

आजपर्यंत आपल्या सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत महाराष्ट्रातील जनतेचा, समाजातील शेवटच्या माणसापासून प्रत्येक घटकाचा आवाज लोकशाहीच्या मंदिरात पोहचविण्याचा प्रांजळ प्रयत्न करत आहे. आपण मला हि संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभारी आहे.

संसदेच्या या जुन्या वास्तूत अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचाही सहवास लाभला. खुप काही शिकताही आले, अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार होता आले. संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे. जुन्या वास्तूचा निरोप घेऊन नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्या आहेत.

...

Supriya Sule : संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश करताना हुरहूर लागल्याची सुप्रिया सुळेंची भावना.... | Sakal

संसदेच्या नवीन वास्तूत प्रवेश करताना जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत, अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली Supriya sule social post while entering new parliament building historical places and events
[mahamtb]पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात स...
[abp maza]महाराष्ट्रातील सिंचन आणि एका बँक घोटाळ्य...