1 minute reading time (206 words)

[policenama]सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गुगल पे, फोनपे बाबत मोठे वक्तव्य

सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गुगल पे, फोनपे बाबत मोठे वक्तव्य

म्हणाल्या "हे मनी लाँड्रिंगचेच…"


नवी दिल्ली : MP Supriya Sule-Money Laundering | गुगल पे, फोन पे हे दोन टाईम बॉम्ब आहेत. यूपीआय पेमेंट्ससाठी याच अ‍ॅप्सचा वापर केला जात आहे. परंतु, सरकार डिजीटल आणि कॅशलेस इकोनॉमीसाठी काय-काय करतंय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. (MP Supriya Sule-Money Laundering )

पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नियमभंग, अनियमितता आढळून आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने तिच्यावर बंदीची कारवाई केली आहे. याच कारवाईचा दाखला देत सुप्रिया सुळे यांनी गुगल पे, फोनपेबाबत मोठे वक्तव्य केले. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्या बोलत होत्या.

मोदी सरकारने यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील काढलेल्या अर्थव्यवस्थेच्या श्वेतपत्रिकेवरून संसदेत जोरदार चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, पेटीएम पेमेंट्स बँक प्रकरण आपल्यासाठी एक प्रकारचा इशारा आहे. हे मनी लाँड्रिंगचेच पकरण आहे.

तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते विजय कुमार यांनी आरोप केला की, केंद्रातील मोदी सरकार ईडी, सीबीआय,
आयकर विभागाचा गैरवापर करत आहे. या केंद्रीय संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांमधील खासदार आणि

नेत्यांविरोधात कारवाई करत आहे. श्वेतपत्रिकेत या संस्थांच्या गैरवापराचा समावेश करायला हवा. 

[ABP MAJHA]लोकसभेत सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांचे ...
[Loksatta]गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रि...