1 minute reading time (104 words)

[ABP MAJHA]मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नक्कीच मिळेल

मला विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय नक्कीच मिळेल

सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच कोर्टात आल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना शरद पवार मुंबईत होते. तर, सुप्रिया सुळे कोर्टात हजर राहून सुनावणीत सहभागी झाल्या. याबाबत पत्रकारांनी त्यांना आज विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "मी आयुष्यात पहिल्यांदाच कोर्टाची पायरी चढली आहे. मी कोर्टबाजीसाठी राजकारणात नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य माय-बाप जनतेची सेवा आणि चांगले धोरण आखण्यासाठी आले होते. मला वाटलं नव्हतं हा दिवस येईल. शेवटी ही सत्याची लढाई आहे. सत्यासाठी जे काही करावं लागेल ते करेन. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्राचे असंख्य कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रात पवारांनी अनेक वर्ष केलेलं काम आणि मायबाप जनतेचं प्रेम आणि आशीर्वादामुळे आम्ही उभे आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत. 

[TV9 Marathi]'कोर्ट काय म्हणतं याला जास्त महत्व' -...
[loksatta]“मी आयुष्यात पहिल्यांदाच…”, SC तील सुनाव...