[Latestly]'विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी'
सुप्रिया सुळे यांची मागणी
आज भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिकमधून बाहेर पडली. विनेशने मंगळवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये एकापाठोपाठ अनेक सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र आज अंतिम सामन्याआधी तिचे वजन थोडे जास्त असल्याचे दिसून आले व त्यानंतर ती अपात्र ठरली. यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी वजन जास्त असल्याने कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरली. मात्र तिच्यासोबत संपूर्ण टीम असताना असे कसे घडले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बारामतीच्या खासदार आणि एनसीपी-एसपी नेत्या सुप्रिया सुळे यांनीही विनेश फोगटसोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणतात, 'लोकसभेत क्रीडामंत्र्यांनी विनेश फोगटच्या अपात्रतेबाबत निवेदन केले. आम्ही या निवेदनाचा निषेध करतो. त्यांच्या निवेदनात पदक हुकल्याबाबतच्या दुःखाचा लवलेशही नव्हता. प्रश्न उपस्थित होतो की विनेश सोबत पाठविलेले कोच, डायटीशन, फिजिकल ट्रेनर्स हे सगळं घडेपर्यंत काय करत होते? एवढा मोठा लवाजमा सोबत असतानाही हा प्रकार घडावा हे अतिशय दुःखद आहे. आमची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. आम्ही सर्वजण या प्रकरणामुळे खुप दुःखी आणि निराश आहोत. ही सपोर्टींग टीमचा चूक आहे हे स्पष्ट आहे.'
The statement of the sports minister in Parliament on Vinesh Phogat is highly condemnable. Vinesh has lost a medal and there has to be a detailed inquiry of the nutritionist, the doctors, a physiotherapist, and the entire support team sanctioned and selected by the IOA that…
— Supriya Sule (@supriya_sule) August 7, 2024