1 minute reading time
(60 words)
[ABP MAJHA]हिंजवडीचं वॉटर पार्क का झालं? सुप्रिया सुळेंचा विशेष पाहणी दौरा
हिंजवडी आणि परिसरातील विकास कामे आणि देखरेखीसाठी एक सक्षम व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यानी जिल्हाधिकारी, पीएमआरडीए, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांची एकत्रित बैठक घ्यावी. हिंजवडी तसेच माण, मारुंजी भागातील रस्ते वाहतूक आणि अन्य समस्या सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यानी पुढाकार घेण्याची गरज असून तशी मागणी आपण करणार आहोत, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.