1 minute reading time (269 words)

[Lokmat]भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

बारामती (पुणे) : सध्या महाराष्ट्रात कोकण रेल्वे व पश्चिम रेल्वेलाइनला जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग अस्तित्वात नाही, तसेच पूर्व भागाला जोडणारा व कोकणात विविध बंदरे, सागरी मार्गांवरील माल वाहतूक करण्यासाठीही समर्पित रेल्वेमार्ग नाही.हे लक्षात घेता बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग सुरू करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मागणी केली आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात माल आणि प्रवासी वाहतूक स्वस्त व कमी वेळेस होण्यास मदत होईल. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होईल. यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे.

बेलसर-वाल्हा-लोणंदपासून भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू होणे फायदेशीर होईल. पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागांतील, तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागाच्या औद्योगिक व इतर विकासाला चालना मिळू शकेल.

हा मार्ग पुणे-मिरज-बेंगलोर या मार्गालादेखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा आहे, तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे कृपया या मार्गाचे सर्वेक्षण करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

...

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule demand Start railway connecting Konkan railway from Bhor taluk | Latest pune News at Lokmat.com

Supriya Sule demand Start railway connecting Konkan railway from Bhor taluk. सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मागणी केली आहे... - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest pune news in Marathi at Lokmat.com
[thekarbhari]रखरखत्या उन्हात प्रवाशांच्या मदतीला ...
[Divya Marathi]खा. सुप्रिया सुळे यांनी सुचवला भोर ...