1 minute reading time (298 words)

[loksatta]गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार?

सुप्रिया सुळे म्हणाल्या…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अर्थात पवार कुटुंबात पडलेल्या फुटीनंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात.

पण, यंदाच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या गोविंदबाग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजित पवार कार्यक्रमांमध्ये मास्कचा वापर करतात. त्यामुळे त्यांना नागरिकांना भेटण्याची परवानगी आहे की नाही? हे डॉक्टर सांगू शकतात."

दिवाळीच्या शुभेच्छा देत सुप्रिया सुळेंनी म्हटलं, "देशातील प्रदूषण, महागाईची संकट दूर व्हावं, हीच पांडुरंगाकडे प्रार्थना करते. अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर झाली असून दुष्काळाची परिस्थिती आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढत आहे."

दरम्यान, अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यामुळे डॉक्टरांना त्यांना आराम करण्याचा सल्ला दिलेला. त्यातच शुक्रवारी शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधील घरी कौटुंबिक कार्यक्रमामुळे पवार कुटुंबीय जमलेले होते. त्यामध्ये शरद पवार व प्रतापराव पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. या कौटुंबिक स्नेहसंमेलनात सहभागी झालेले अजित पवार खासगी विमानाने थेट दिल्लीत दाखल झाले.

अजित पवार यांनी आपले सहकारी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह ६-अ कृष्ण मेनन रोडवरील अमित शाहांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार यांनी शाहांची भेट घेतल्याचे अजित पवार गटाच्या वतीने सांगण्यात आले असले तरी, ही सदिच्छा भेट तासाभरापेक्षाही जास्त वेळ झाल्याने राज्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्द्यासंदर्भात शाहांनी अजित पवारांशी संवाद साधल्याचे सांगितले जाते.

[news18marathi]दिल्लीवरून आल्यानंतर अजितदादा आणि स...
[lokmat]"शरद पवार ज्यावेळेस दहावीला होते...