[RNO Official]राज्यात दडपशाही सुरू आहे, लोकांसाठी न्याय मागायचा की नाही?- सुप्रिया सुळे
बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात,त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. - बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी,बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. - मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत.याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. - राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढत आहे.शेतीला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. रूलर इंडियाचा डेटा सांगतो हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. - मी गेल्या काही दिवसांपासून सरकारला विनंती करीत आहे. - पेटीएम मध्ये विश्वासाच्या नात्याने पैसे ठेवत आहेत, मात्र सगळा काळा पैसा पेटीएम माध्यमातून गोळा केला जात आहे. - सगळ्यात जास्त पैशाचा घोळ पेटीएम च्या माध्यमातून होत आहे.हा आरबीआयचा डेटा सांगतो. - कांद्याच्या निर्यात बंद करण्याचं कारण काय ? शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणारा हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला का ? - शेतकऱ्यांच्या विरोधातले हे केंद्र सरकार आहे. - पक्ष फोडने,घरे फोडणे एवढंच काम सरकार करीत आहेत. - अनेक समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. - ओरिसा,आंध्रप्रदेश,जम्मु काश्मीर यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेतला ? मग मराठा आणि धनगर,लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न का? घेतला नाही. - बाकीची राज्य जर पाठवत असतील तर महाराष्ट्र सरकार का पाठवत नाही. एकीकडे आरक्षण देता म्हणतात तर मग का देत नाहीत. ही जरांगे पाटलांची फसवणूक नाही का ? पुन्हा त्यांना आंदोलन करावे लागले. - महाराष्ट्र सरकारकडून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव का केंद्रात पाठवला जात नाही. - केंद्र सरकारचा महाराष्ट्रवर एवढा राग का ? सगळ्या राज्यातील आरक्षणाचे प्रश्न सुटतात मग महाराष्ट्रातील आरक्षणाचे प्रश्न का सुटत नाहीत ? - आंध्र प्रदेश, ओरिसा जम्मू-काश्मीर यांना न्याय मग महाराष्ट्राला का न्याय नाही.