1 minute reading time (243 words)

[Navarashtra]‘चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊदे’

‘चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊदे’

सुप्रिया सुळेंचं विठ्ठलाकडे साकडे

बारामती : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे घातलं'.

वारीमध्ये राहुल गांधी सहभागी होणार का यावर त्या म्हणाल्या, 'माझ्या कानावर ही गोष्ट आलेली नाही. वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारा संप्रदाय समाज आहे. वारीमध्ये प्रत्येकाचे स्वागत केलं जातं. तसेच शरद पवारांच्या वारीच्या सहभागाबाबत त्या म्हणाल्या, 'याबाबत मला त्यांचा प्रोग्राम माहीत नाही. ते वारीला नक्की येतील. माझी आजी शारदाबाई पवार आणि माझी काकी आशाताई पवार पालखीसाठी, स्वागत करण्यासाठी येत असतात'.

सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 'हे तर जुमला सरकार आहे. महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राज्यात वीज, अन्न, भाजी, पेट्रोल या सगळ्या गोष्टीच महाग आहेत. सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं नसतं. त्यामुळे पॉलिसी म्हणून देखील काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहावं लागतं. नक्की काय प्रस्ताव केलाय याबाबत मी माहिती घेऊन बोलेन'. 

...

‘चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊदे’; सुप्रिया सुळेंचं विठ्ठलाकडे साकडे- Marathi News - Navarashtra

हे तर जुमला सरकार आहे. महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. राज्यात वीज, अन्न, भाजी, पेट्रोल या सगळ्या गोष्टीच महाग आहेत. सगळ्या गोष्टीत राजकारण करायचं नसतं. त्यामुळे पॉलिसी म्हणून देखील काही गोष्टींकडे गांभीर्याने पाहावं लागतं.
[ABP MAJHA]खासदार सुप्रिया सुळेंनी केलं संत तुकारा...
[Agrowon]राज्यासह केंद्रातील ट्रीपल इंजिन सरकार अस...