2 minutes reading time
(487 words)
[hindustan times]बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींचा १ लाख मतांनी केला पराभव
अजित पवारांना धक्का
बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यावर अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना येथून उभे केले होते. तर त्यांच्या विरोधात त्यांच्या नणंद व या मतदार संघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे या उभ्या होत्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर सुप्रिया सुळे यांनी त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. बारामतीच्या १९ वी फेरीत सुप्रिया सुळे यांना एक लाख १३ हजार मतांनी आघाडी घेत विजयी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे या सुरवातीपासून आघाडीवर होत्या. तर काही काल सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या, मात्र, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा कमबॅक करत विजयी घोडदौड सुरूच ठेवली.
देशात लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली होती. अजित पवार यांनी बंड करत शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्ष हस्तगत केला. तसेच शरद पवार यांचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून थेट त्यांना आव्हान दिले. या मतदार संघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार अशी लढत असली तरी खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी झाली. या लढतीत अखेर शरद पवार यांचा विजय झाला आहे. बारामतीकरांनी शरद पवार यांच्यावर विश्वास दाखवत सुप्रिया सुळे यांना विजयी करून दिले आहे. या लढतीत सुप्रिया सुळेंनीच बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांना ३ लाख २६ हजार ०४ मते मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांना २ लाख ३ हजार ४७९ मतं मिळाली आहेत. तब्बल १ लाखाहून अधिक मतांनी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.
पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळे या आघडीवर होत्या. चौथ्या फेरीत सुप्रिया सुळे यांचे एकूण मताधिक्य १९ हजार ९४७ होते. दरम्यान, काही फेरीनंतर हे मताधिक्य घटून सुप्रिया सुळे या पिछाडीवर गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी पुन्हा आघाडी घेत त्यांचे मताधिक्य टिकून ठेवले. सुप्रिया सुळे यांनी ८,९ आणि दहाव्या फेरीत आघाडी कायम ठेवत ३५ हजार मताधिक्य घेतले होते. तर १० व्या फेरीदरम्यान, सुळे या ४८ हजार ६०० मतांनी आघाडीवर होत्या. चौदाव्या फेरीत सुप्रिया सुळे यांचे एकूण लीड हे ७३ हजार ६३१ होते. तर १९ व्या फेरी अखेर सुप्रिया सुळे या १ लाख १३ हजार मतांनी आघाडीवर होत्या.
बारामती लोकसभा मतदार संघातील सहाही तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी मतदान झालह होते. बारामती विधानसभा मतदारसंघात २ लाख ५६ हजार ५३१, दौंड विधानसभा मतदारसंघात १ लाख ८३ हजार ५६८, इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतदान २,१७,१७३ मतदान, पुरंदर विधानसभा मतदारसंघात २,३१,६७९ तर भोर विधानसभा मतदारसंघात एकूण २,४५,१५ मतदान झाले होते. तर निर्णायक खडकवासला मतदारसंघात २ लाख ७७ हजार ३६५ मतदान झाले होते.
Baramati Election Result : बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा वहिनींचा १ लाख मतांनी केला पराभव; अजित पवारांना धक्का-baramati lok sabha election result 2024 supriya sule win against sunetra pawar ,निवडणुका बातम्या
Baramati Election Result 2024 : सर्व देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. नणंद आणि भावजय दरम्यान, झालेल्या या निवडणुकीत नणंद वरचढ ठरली आहे. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा तब्बल १ लाख मतांच्या फरकरणे पराभव केला आहे.,निवडणुका बातम्या