1 minute reading time (114 words)

[Lokshahi Marathi]बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

बारामतीतील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या बारामतीत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाषण केले यावेळी त्यांनी धनगर आरक्षणावर आवाज उठवत राहणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्या म्हणाल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या ऋणानुबंधा राहिलेला आहे धनगर समाजासोबतच मराठा, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी संसदेत पाठपुरावा करत असल्याचे नमूद करत, धनगड आणि धनगर एकच आहेत. पण केंद्र सरकार हे मान्य करत नाही ही मोठी आश्चर्याची बाब आहे. असे त्या म्हणाल्या धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील भाजप आणि केंद्रातील भाजपा यांची परस्परविरोधी भूमिका आहे. भाजप धनगर समाजाची दिशाभूल करत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पण आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरु असून यात यश येईल असे त्यांनी नमूद केले.धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही हा संकल्प सुळे यांनी व्यक्त केला.


[TV9 Marathi]'धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संसदे...
[maharashtralokmanch]बारामती आणि दौंड तालुक्यात प्...