1 minute reading time
(77 words)
[Sarkarnama]तू 1500 रुपये परत घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा कार्यक्रम करते!
सुप्रिया सुळेंचा रवी राणांना दम
राज्यात लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होत आहे. मात्र काही नेत्यांच्या विधानांनी या योजनेभोवती वादाची किनार तयार होऊ लागली आहे. आमदार रवी राणा यांनी महायुतीला मतदान केले नाही तर योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले. आमदार राणांच्या या विधानामुळे विरोधकांनी सरकारविरोधात रान पेटवले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तर आमदार राणांना थेट दम भरला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या योजनेवरून आता आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

