1 minute reading time (88 words)

[ABP MAJHA]यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून 'कविवर्य ना. धों. महानोर' पुरस्काराची सुरुवात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडून 'कविवर्य ना. धों. महानोर' पुरस्काराची सुरुवात

 कवी महानोर यांच्या नावाने साहित्य आणि शेती-पाणी या तीन क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या राज्याच्या प्रत्येक विभागातील होतकरू युवक-युवतींना एकूण सहा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यातील लेंडेझरी येथील शीला खुणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील आष्टी गावाच्या वर्षा हाडके यांना शेती-पाणी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी तर गणेश घुले, औरंगाबाद; महेश लोंढे, बारलोणी, सोलापूर; नामदेव कोळी, कडगाव, जि. जळगाव; आणि प्रदीप कोकरे, मुंबई या गुणवंतांना साहित्य क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

[TV9 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह
[TV9 Marathi]पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक...