2 minutes reading time (386 words)

[TV9 Marathi]बारामतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार कोण?

बारामतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार कोण?

सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले…

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेचा मतदार संघ बारामती ठरला होता. या निवडणुकीत पवार कुटुंबियामध्येच लढत झाली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यातील लढत रंगली होती. भावजय-नणंद यांच्या या लढतीत नणंद सुप्रिया सुळे हिने बाजी मारली. त्यानंतर आता बारामती विधानसभेची चर्चा आतापासून सुरु झाली आहे. विधानसभेत काका-पुतण्यात लढत रंगणार असल्याचे बॅनर्स लागले आहेत. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका-पुतण्यात लढत होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

बारामती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार? युगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्या आघाडीत जागा वाटप होईल. जागा वाटपात बारामती मतदार संघावर कोण दावा करणार? कोणाचा दावा मजबूत असणार? हे ठरणार आहे. त्यानंतर बारामतीमधून कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार असणार हे ठरणार आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार उमेदवार असणार? यासंदर्भात बॅनर्स लागले. परंतु त्यासंदर्भात आपणास माहीत नाही. मी दिल्लीत होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. कुस्तीसंघावरुन युगेंद्र पवार यांना काढले? त्याचे आपणास आश्चर्य वाटले आहे.

पुण्याला मंत्रीपद पण…

पुण्याला मंत्रीपद मिळाले आहे, चांगली गोष्ट आहे. मात्र आता कंत्राटदाराला त्याचा फायदा न होता सर्व सामान्य लोकांना व्हावा. तसेच केंद्राच्या आजच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. धंगेकर थोड्याच मतांनी पराभव झाले आहेत, मात्र ते पक्के आहेत, ऑक्टोबरमध्ये ते पुन्हा आमदार होतील.

पुण्यात शनिवारी झालेल्या पावसावरुनही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, एक दिवस पाऊस पडला आणि माझ्या मतदारसंघात सिंहगड परिसरात 2 वेळा पाणी तुंबले. त्याला जबाबदार प्रशासन आणि हे खोके सरकार आहे.

राष्ट्रवादीतील काही नेते अडचणीत आले असतील मात्र कार्यकर्ता लढत राहिला. गेल्या काही दिवसांत पक्षात मध्ये काही घटना काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे वंदना चव्हाण यांच्याकडे काही जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

...

बारामतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार कोण? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले... - Marathi News | Yugendra Pawar is not a candidate from Baramati assembly constituency, says Supriya Sule marathi news | TV9 Marathi

supriya sule ncp vardhapan din: जागा वाटपात बारामती मतदार संघावर कोण दावा करणार? कोणाचा दावा मजबूत असणार? हे ठरणार आहे. त्यानंतर बारामतीमधून कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार असणार हे ठरणार आहे.
[Lokmat]पक्ष फोडायला अन् सत्तेचे नंबर वाढवायला त्य...
[TV9 Marathi]‘दिल्लीतून मला बातमी आलीय, RSSला महार...