1 minute reading time (152 words)

[Mumbai Tak]शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

शरद पवार गटाची विधानसभेसाठी रणनीती काय? सुळे रोखठोक

मुंबई Tak ने आयोजित केलेल्या 'बैठक' कार्यक्रमात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे सहभागी होत आहेत.मुंबई Tak च्या या बैठकीत राजकारण, समाजकारण त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला पाहायला मिळतील. मुंबई Tak च्या बैठकीतील या सेशनध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची रणनीती विधानसभेत कशी असेल याबद्दल सुप्रिया सुळे बोलतील.याशिवाय पक्षफुटीनंतर भाऊ अजित पवारच दूर गेल्यानं पवार परिवारात सध्या काय सुरु आहे? विधानसभेलाही अजित पवारांसमोर त्यांचे पुतणे योगेंद्र पवार लढतील अशी चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही घरातूनच मिळणारे आव्हान कसं पेलणार? पवार परिवारात सगळं काही आलबेल आहे का? महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुनही महाविकास आघाडीत मतभेद आहेत. महाविकास आघाडीतील हा तिढा कसा सुटणार? यावरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे मुंबई Tak च्या बैठकीत मांडतील. मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच पक्षाची अधिकृत भूमिकाही स्पष्ट करतील. यासह महाराष्ट्र आणि देशातील घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे आपली मतंही मुंबई Tak ने आयोजित केलेल्या 'बैठक' कार्यक्रमात मांडतील.

[Zee 24 Taas]खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषद Li...
[ABP MAJHA]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह