2 minutes reading time (469 words)

[lokmat.news18]'हा गंभीर विषय असून, माझी शासनाला..'

'हा गंभीर विषय असून, माझी शासनाला..'

MPSC डेटा लीक प्रकरणावर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी

 मुंबई, 23 एप्रिल : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क साठीची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे, या परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. फक्त प्रवेशपत्रिकाच नाही तर विद्यार्थ्यांचे दूरध्वनी क्रमांक, आधार क्रमांक आणि घराचा पत्तादेखील सर्वांसाठी उपलब्ध झाला. यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मोठी मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ट्विट करत त्यांनी या प्रकरणावरुन शासनाला धारेवर धरले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दि 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पुर्व परीक्षा गट ब आणि क यांची हॉल तिकीटे सोशल मिडियात लीक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीटे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हा अतिशय गंभीर विषय असून, माझी शासनाकडे मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी नव्या चिंतेत

 कधी हॉलतिकीट वेळेत मिळत नाही, तर कधी परीक्षाच पुढे ढकलल्या जातात, तर कधी परस्पर गुण कमी केले जातात. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कायमच अभ्यासासोबत अधिक चिंता असते ती परीक्षा पार पडण्याची, एवढ कमी होतं तर आता विद्यार्थ्यांची गोपनीय माहितीसुद्धा जगजाहीर झालीय. येत्या रविवारी 30 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट ब आणि गट क'साठी संयुक्त पूर्व होणार आहे. या परीक्षेकरिता लागणारे हॉल तिकीट टेलिग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झालं. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हायरल झाली जी जॉईन केली असता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या 90 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सहज डाऊनलोड करता येत होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच हॉलतिकीट वितरित करण्यात आले. ते डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो, तो प्रविष्ट केल्यानंतरच हॉलतिकीट डाऊनलोड करता येतं, असं असूनही अगदी सहजरित्या या टेलिग्राम ग्रुपवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि सोबत गोपनीय माहिती जाहीर करण्यात आली. या ग्रुपवर एक मेसेज करण्यात आला ज्यात म्हटलंय की, "हा फक्त नमुना आहे, आमच्याकडे सर्व MPSC विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली प्रमाणपत्रे, आधार क्रमांक, खासगी दूरध्वनी, इमेल आयडीसुद्धा आहेत. सोबत पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे." सोशल मीडियामुळे जसा फायदा होतो तसा त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

...

'हा गंभीर विषय असून, माझी शासनाला..' MPSC डेटा लीक प्रकरणावर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी – News18 लोकमत

MPSC परीक्षेचे हॉल तिकिट्स हॅक झाले असून थेट टेलिग्रामवर 90 हजार पेक्षा जास्त प्रवेशपत्र अपलोड झाले आहेत. या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी मागणी केली आहे.
[letsupp]पोलिस बळाचा वापर करु नका, चर्चा करुन तोडग...
[letsupp]…यामुळे सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, उपम...