1 minute reading time
(62 words)
[Lokshahi Marathi]'सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते' - सुप्रिया सुळे
सर्वात सुंदर पैठणी पैठणमध्ये बनते असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या दाैऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी मऱ्हाटी पैठणी साडी केंद्र व महाराष्ट्र हस्तकला दालनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिला कारागिरांशी संवाद साधून हातमागावर बनवल्या जाणाऱ्या पैठणीची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच आपल्या कलाकुसर आणि मेहनतीच्या बळावर पैठणीला ओळख मिळणून देणाऱ्या महिलांना भेटून आनंद झाला. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.