1 minute reading time
(89 words)
[Saam TV]सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आमच्या पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी मी नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यासोबतच काँग्रेस नेते सुनील केदार यांची मुलगी पौर्णिमा केदार यांच्या एका इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मी सहभागी होणार आहे. भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अतिशय महत्त्वाचा सामाजिक आणि शैक्षणिक विषय आहे. भाषेच्या संदर्भातील जाणकार, तज्ञ यांचे विचार जाणून घेणे अत्यावश्यक आहे. हा विषय फक्त राजकारण म्हणून हाताळणे योग्य ठरणार नाही, असे सध्या राज्यात सुरु असणाऱ्या हिंदी मराठी मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले.