2 minutes reading time (306 words)

[Policenama]संपत्तीवाढीबाबतचा ‘एडीआर’चा अहवाल सुप्रिया सुळेंनी फेटाळला

संपत्तीवाढीबाबतचा ‘एडीआर’चा अहवाल सुप्रिया सुळेंनी फेटाळला

 मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | एडीआर (ADR) अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यात भाजपचे (BJP) ४३, काँग्रेसचे (Congress) १०, तृणमुल काँग्रेसचे (TMC) ७, बीजेडी (BJD) आणि शिवसेनेचे (Shivsena) प्रत्येकी २-२, खासदारांचा यात समावेश आहे. तर, जेडीयू (JDU), एमआयएम (AIMIM), एनसीपी (NCP), शिरोमणी अकाली दल (Shiromani Akali Dal), एआययुडीएफ (AIUDF), आययुएमएल (IUML), नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) यांच्या १-१ खासदाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

या अहवालानुसार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ८९ कोटींची वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे. तर भाजप खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Dave) यांच्या संपत्तीमध्ये २० कोटींची, प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्या संपत्तीमध्ये १० कोटींची, भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्या संपत्तीत ६ कोटी रूपयांची वाढ झाल्याचे नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या अहवालातून समोर आलेली माहिती ही खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच माझ्या संपत्तीची कागदपत्रे तपासून पहा. अशी प्रतिक्रिया यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

हा अहवाल एडीआर म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने दिला आहे.
२००९ ते २०१९ दरम्यान पुन्हा निवडूण आलेल्या ७१ खासदारांच्या संपत्तीत २८६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
असं या अहवालात नमूद करण्यात आले आहे. खासदारांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे हा दावा केला गेला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.
या अहवालानुसार देशातील खासदारांमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसीमरत कौर बादल यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
हरसीमरत कौर बादल यांच्या संपत्तीत तब्बल १५७ कोटींची वाढ झाल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदविण्यात आला आहे.

...

Supriya Sule | संपत्तीवाढीबाबतचा 'एडीआर'चा अहवाल सुप्रिया सुळेंनी...

Supriya Sule | एडीआर (ADR) अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म या संस्थेकडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यानुसार दुसऱ्यांदा खासदार
[News 18 Lokmat]'संपत्ती वाढली नाही, कागदपत्रं तपा...
[Saamana]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून सा...