1 minute reading time (259 words)

[sakal]'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून सुप्रिया सुळेंची लेक झाली ग्रॅज्युएट!

'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून सुप्रिया सुळेंची लेक झाली ग्रॅज्युएट!

शेअर केली भावनिक पोस्ट

मुंबई : देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची लेक रेवती हीनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आजच तिचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल समोर आल्यानंतर आई सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली आहे.

 "आमची मुलगी रेवती ही नुकतीच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री मिळवत पदवीधर झाली आहे. आजच तिचा रिझर्ल्ट आला असून पालक म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. आम्हाला तिचा हा प्रवास अनुभवता आला नाही त्याबद्दल भयंकर दुःख वाटत आहे, पण हेच तर आयुष्य आहे," अशा आशयाची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर केली आहे.

भारताचे टॉप स्कॉलर याच संस्थेत शिकले

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही एक प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्था असून या संस्थेतून भारतातील दिग्गज लोकांनी शिक्षण घेतलं आहे. यामध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीएचडी, भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन, भारताचे माजी संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन, सर्वाधिक काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद भूषणवलेले नेते ज्योती बसू यांनी या संस्थेतून डिग्री मिळवली आहे.

...

'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मधून सुप्रिया सुळेंची लेक झाली ग्रॅज्युएट! शेअर केली भावनिक पोस्ट : Ravati Sule | Sakal

अर्थशास्त्रात शरद पवारांच्या नातीनं आणि सुळेंच्या लेकीनं आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. Supriya Sule daughter Revati graduated from London School of Economics Shared an emotional post
[Sakal]"आम आदमी पक्षाने आम्हाला चोर म्हटलं ठीक आहे...
[loksatta]“रेवती तुझा अभिमान वाटतो..”