1 minute reading time (221 words)

[sarkarnama]मुख्यमंत्री शिंदे-राहुल नार्वेकरांची गुप्त बैठक संशय निर्माण करणारी? -सुप्रिया सुळे

मुख्यमंत्री शिंदे-राहुल नार्वेकरांची गुप्त बैठक संशय निर्माण करणारी? -सुप्रिया सुळे

Maharashtra Politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे सुप्रिया सुळे यांनी या गुप्त बैठकीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी गुप्तबैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीत आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण ही भेट विकासकामांसंदर्भात झाल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आलं. आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या बैठकीवरून सवाल उपस्थित केला आहे.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यात गुप्त बैठक झाली असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. असं असताना गुप्त बैठक झाली तर ते संविधानाच्या विरोधात आहे', असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

...

मुख्यमंत्री शिंदे-राहुल नार्वेकरांची गुप्त बैठक संशय निर्माण करणारी? सुप्रिया सुळे बोलल्या... | supriya sule reaction on cm eknath shinde and rahul narwekar meeting | Sarkarnama

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या गुप्त बैठकवरून आता सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. | Supriya Sule On CM Eknath Shinde Meeting | Sarkarnama
[loksatta]राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या ...
[loksatta]“ललित पाटील प्रकरणावर बोलणाऱ्यांची तोंड ...