1 minute reading time
(72 words)
[NavaRashtra]सुसंस्कृत महाराष्ट्रात वैयक्तिक टीका नको - सुप्रिया सुळे
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि कामगिरीचं असावं. मतभेद असावेत, मनभेद असू नयेत, असं सांगत वैयक्तिक स्तरावर केलेली वक्तव्यं समाजात चुकीचा संदेश देतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.