1 minute reading time (88 words)

[TV9 Marathi]लोकांनी जनादेश दिला पण सरकार काम कधी सुरु करणार

लोकांनी जनादेश दिला पण सरकार काम कधी सुरु करणार

महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना निवडून दिलं आहे. मी रोज चॅनल्सवर रुसवे-फुगवे पाहिले आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलं जातं. कामाला लागण्याऐवजी हे सरकार रुसव्या फुगव्यांमध्ये अडकलं आहे. महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत. जीडीपी कमी झाला आहे. राज्यासमोर आणि देशासमोर खूप आव्हानं आहेत. बेकारी, अर्थव्यवस्था यावर या सरकारने गांभीर्याने चर्चा करायला हवी होती पण तसं दिसत नाही. तसंच बीड आणि परभणी या ठिकाणी झालेल्या दोन्ही घटनांचा मी जाहीर निषेध नोंदवते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे की हा विषय त्यांनीही गांभीर्याने घेतला पाहिजे आणि महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे. 

[ABP MAJHA]देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा,बीड-परभणी...
[Lokshahi Marathi]परभणीतील बंदला हिंसक वळण, खासदार...