2 minutes reading time
(309 words)
[Loksatta]शक्तिपीठाला एक लाख कोटी, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला काय - सुप्रिया सुळे
सातारा: राज्यात तीव्र दुष्काळाची सावली अधिक गडद झाली आहे .ग्रामीण जनता पाण्यासाठी होरपळत असताना सरकारला निवडणुकांची घाई का लागली आहे.शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटी रुपये उभे करू शकणाऱ्या सरकारकडे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी पैसा कसा नाही? असा थेट आणि तीक्ष्ण सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला. 'आधी मायबाप जनतेचे अश्रू पुसा, मगच निवडणुका घ्या,:असा इशाराही त्यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त त्या साताऱ्यात आल्या होत्या. साताऱ्यात त्या कार्यक्रमानंतर स्वतंत्ररित्या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.
सरकारच्या चुकीच्या प्राधान्यक्रमावर ताशेरे ओढताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, शक्तिपीठ महामार्ग दोन वर्षे उशिरा झाला तर राज्याचे काही फार मोठे नुकसान होणार नाही. मात्र, दुष्काळ आणि पैशांच्या अभावी एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण थांबले, तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, विद्यार्थ्यांची पूर्ण फी माफी आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या वेळेवर सुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला. सध्या राजकारण किंवा निवडणुका लढवण्याची वेळ नसून, दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सर्व पक्षांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे. त्यामुळे दुष्काळाचे संकट दूर होईपर्यंत या निवडणुका पुढे ढकलाव्यात,असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी रोजगार हमी योजनेतील बदल आणि 'डीपीडीसी'चा (जिल्हा नियोजन समिती) निधी फ्रीज करण्याच्या निर्णयावर कठोर टीका केली.

मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे गायब होण्याच्या प्रकाराची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. जिल्हा परिषदांना दमदाटी करण्याची ताकद सरकारकडे आहे; पण त्याच जिल्ह्यातील जनतेला मदत करण्यासाठी वेळ नाही. सरकारने आधी जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यावे,असा घणाघात सुळे यांनी केला.तसेच, हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेऊन सरकारने संवादाची भूमिका घ्यावी, असे आवाहन करत पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा पुढील दोन दिवसांत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.