1 minute reading time (114 words)

[NDTV Marathi]Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Ajit Pawar यांचा मुलगा जय विवाहबंधनात?

Supriya Sule नी फेसबूकवरुन दिली आनंदाची बातमी

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या लग्न बंधनाचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या की, जयच लग्न ठरतंय आम्हाला आनंद होत आहे. ऋतुजा ही येणारी आमची सून व जय हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व प्रतिभा काकी यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी माझ्या बहिणी व वहिन्या बरोबर होत्या. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.

[Maharashtra Times]Jayant Patil शरद पवारांना 'जय म...
[My Mahanagar]जयंत पाटील पक्ष सोडणार, सुळे काय म्ह...