1 minute reading time (211 words)

[letsupp]अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट

अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट

जखमींची विचारपूस

 Pune-Bengaluru Expressway : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. पुणे येथील नऱ्हे आंबेगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला आहे. बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुलावर नोव्हेंबरमध्ये मोठा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता, येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे. रस्ते सुरक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे. मी या संदर्भात संसदेत देखील मुद्दा मांडला आहे. त्यामुळे सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

[maharashtralokmanch]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने...
[loksatta]''नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत कें...