1 minute reading time (79 words)

[AIR PUNE]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी

भेट देऊन पाहणी केल्यानंतर खा. सुळे यांची मागणी

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 

[TV9 Marathi]पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघात
[maharashtralokmanch]अपघातग्रस्तांना राज्य शासनाने...