2 minutes reading time (432 words)

[ETV Bharat]विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, 'आज माझा भाऊ नाही, कशाला खरं खोट करायचं...'

विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, 'आज माझा भाऊ नाही, कशाला खरं खोट करायचं...'

पुणे : खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मतदार संघातील तसंच पुणे शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

दादा नाही, दे दु:ख आयुष्यभर राहील : "आज माझा भाऊ नाही. माझा भाऊ मोकळ्या मनाचा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. माझा दादा नाही, हे दुःख आयुष्यभर माझ्या मनात राहील. त्यामुळं कशाला खरं खोटं करत बसायचं. जे खरं आहे ते माझ्या भावात आणि माझ्यात झालं आहे. आता दादाला सगळ्यात मोठी हीच श्रद्धांजली असेल," असं खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी यातून मार्ग काढला पाहिजे : "दर दोन महिन्यांनी मी महानगरपालिका तसंच जिल्हा परिषदेत बैठक घेत असते. मतदार संघातील विकासकामांबाबत माहिती घेत असते. छोटासा आढावा आज आम्ही घेतला. आज शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तसंच गुडलक चौक येथील कलाकार कट्टा काढू नका अशी विनंती आज केली. त्यांनी शब्द दिला की कलाकार कट्टा हलवणार नाही. शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. जलसंपदानं पत्र दिलं आहे की, काही निधी देण्याचं काम बाकी आहे. त्यावर चर्चा झाली. विकासकामं वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. तसंच रिंगरोड देखील वेळेत पूर्ण व्हायला हवा. जलसंपदा-महानगरपालिकेच्या वादाबद्दल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून मार्ग काढला पाहिजे," असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

आंदोलन शांततेच्या मार्गानं झालं पाहिजे : "पुण्यात घटना झाली ती दुर्दैवी आहे. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र आंदोलन शांततेच्या मार्गानं झालं पाहिजे. जी काही कटुता येत आहे ती सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस भवन इथं झालेल्या दगडफेकीबाबत दिली.

सर्वांनी शांतता राखली पाहिजे : "मी या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी बोलले आहे. तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींशी बोलणं झालं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की, शांतता राहिली पाहिजे. याबाबत योग्य तपास सुरू आहे. हा विषय वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी भिगवन घटनेबाबत दिली.

विमान अपघाताबद्दल सगळ्यांना उत्तर हवं : "एकतर रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. दादा हा त्याचा काका होता. आज समाजातील सगळेच लोक अस्वस्थ आहेत. विमान अपघाताबद्दल सगळ्यांना उत्तर हवं आहे. रोहित उत्तर शोधत आहे. आमच्या घरात जे झालं ते कोणाच्याही घरात होऊ नये. या सगळ्या अपघाताचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. जे काही सत्य असेल ते बाहेर येईल. तसंच ब्लॅक बॉक्समधील माहिती तांत्रिक असून ती मिळेल. अपघाताबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळं सगळ्यांसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत दिली. 

...

विलीनीकरणाबाबत सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या; म्हणाल्या, 'आज माझा भाऊ नाही, कशाला खरं खोट करायचं...'

खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणासह विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.
[TV9 Marathi]विलिनीकरणात तटकरे आणि पटेलांची आडकाठी...
[Prahaar]कामाला लागा हीच दादांना आता सर्वात मोठी श...