1 minute reading time
(59 words)
[Zee 24 Taas]मुलांना रस्त्यावर उतरावं लागतंय हे सरकारचं अपयश -सुप्रिया सुळे
MPSC परीक्षार्थ्यांनी पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात मोठा आक्रोश मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शवला. हा मोर्चा ओंकारेश्वर मंदिर चौकापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळून सुरू होऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असून, त्यात मुलींची संख्याही लक्षणीय होती.

